आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका – प्रणव मुखर्जी

December 26, 2008 3:33 PM0 commentsViews: 5

26 डिसेंबरभारताने आज पाकिस्तानविरुद्धची आपली भूमिका आणखीन कडक केली आणि पाकिस्तानच्या नाकर्तेपणाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला. भारत दौ-यावर असलेल्या सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांना प्रणव मुखर्जी म्हणाले की. भारतावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आणखी एक जरी हल्ला केला तर आमची सहनशक्ती संपलेली असेल आणि आम्ही सरळ लष्कराचा वापर करू. कॅबिनेटच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीनंतर प्रणव मुखर्जी यांनी हे विधान केलं. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. सौदी अरेबियाने भारताला आश्वासन दिलं की ते पाकिस्तानवर दबाव आणतीलआणि दहशतवाद्यांवर कारवाई करायला भाग पाडतील. अरब देशांचा पाठिंबा मिळवणं भारतासाठी महत्त्वाचं आहे. कारण हे देश नेहमीच पाकिस्ताची बाजू घेत आले आहेत.

close