राणेंच्या भाषणादरम्यान आंदोलकांची हुल्लडबाजी

April 4, 2013 5:20 PM0 commentsViews: 14

04 एप्रिल

मुंबई : इथं आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. मश्जिद बंदरहून निघालेला मोर्चा आझाद मैदानात पोहचला आणि तिथं जाहीर सभा झाली. पण, या जाहीर सभेत उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या भाषणादरम्यान, आंदोलकांनी हुल्लडबाजी केली. छत्रपती संभाजीराजेंच्या आवाहनानंतर आंदोलक शांत झाले. पण, त्यानंतर राणेंनी आपलं भाषण आटोपतं घेतलं. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचं अजित पवारांनी विधान परिषदेत आश्वासन दिलंय. यासंदर्भात नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालानंतर निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. या मोर्चात अखिल भारतीय मराठा संघटना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार यूनियन, छावा संघटना, भारतीय मराठा महासंघ आणि वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद या संघटना सहभागी झाल्या होत्या. मराठा समाजाच्या मागण्या अनेक वर्षांपासून सरकार दरबारी प्रलंबित आहेत आणि या मुद्याचा वापर फक्त मतांच्या गणितासाठी केला जातो, असा आरोप मराठा संघटनांनी केला.

close