तुका आकाशाएवढा..

March 29, 2013 3:14 PM0 commentsViews: 33

29 मार्च

आज तुकाराम बीज. आजच्याच दिवशी तुकाराम कीर्तन करत असताना सदेह वैकुंठाला गेले, अशी आख्यायिका आहे. आजच्या दिवशी तुकाराम महाराजांचं स्मरण म्हणून बिजेचा सोहळा साजरा केला जातो. हा सोहळा अनुभविण्यासाठी लाखो वारकरी दरवर्षी देहूत आवर्जून हजेरी लावतात. यंदाच्या वर्षी या सोहळ्याच्या निमित्तानं दुष्काळग्रस्तांसाठी अडीच लाखांचा निधी देवस्थाननं पुण्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला.

close