‘मूठभर धान्य पक्षांसाठी, एक रूपया पाण्यासाठी’

April 2, 2013 4:16 PM0 commentsViews: 43

शशी केवडकर, बीड

02 एप्रिल

वन्य जीवांना मदत व्हावी म्हणून "मूठभर धान्य पक्षांसाठी आणि एक रुपया पाण्यासाठी" अशी मोहीम शिरूर तालुक्यातील पक्षीमित्र सध्या राबवित आहेत.दुष्काळाच्या दाहकतेत आता माणसांबरोबर पशुपक्षीही होरपळुन निघत आहेत. पाण्याच्या अभावानं या जिवांना मृत्यृला कवटाळावं लागत आहे.

बीड जिल्ह्यात राज्यातलं एकमेव मयूर अभयारण्य आहे. पण यंदाच्या भीषण दुष्काळामुळे अन्न, पाण्याअभावी इथले मोर आणि लांडोर इतर ठिकाणी स्थलांतर करताहेत. स्थलांतरादरम्यान काही मोरांचा मृत्यूही होतो. आतापर्यंत 5 मोर आणि 6 काळविटांचा मृत्यू झाल्याचा दावा पक्षी मित्र करत आहेत.

अशी परिस्थिती असतानासुद्धा योग्य ती पावलं उचलण्याऐवजी वन विभागाने डोळेझाक करण्याची भूमिका घेतलीय. म्हणूनच शिरूरच्या वन्य जीव संरक्षण आणि संवर्धन संस्थेनं गावात लोकसहभागातून 'मूठभर धान्य पक्षांसाठी, एक रूपया पाण्यासाठी' ही मोहीम राबवली. या मोहिमेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. वन्यजिवांना दुष्काळाच्या झळा बसत असल्याचा नुसताच डांगोरा पिटत न बसता या जिवांना वाचवण्यासाठी हे पक्षीप्रेमी पुढे आले. याचं सर्वत्र कोतुक होतंय.

close