लाहोर स्फोटप्रकरणी पाकचा खोटेपणा उघड

December 26, 2008 3:38 PM0 commentsViews: 8

26 डिसेंबरलाहोर स्फोटासंदर्भात पाकिस्तानने भारताला दोषी ठरवलं होतं. एका भारतीय नागरिकाला याबाबत अटक केल्याचा दावाही केला होता. पण आता पाकिस्तानच्याच अन्सर-वा- मुहाजीर यांनी या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे पाकिस्तानाचा हा दावा खोटा ठरला आहे.लाहोरमध्ये गुरुवारी झालेल्या एका छोट्या बॉंबस्फोटात एक महिला मृत्युमुखी पडली होती. हा बॉंबस्फोट भारतीय दूतावासात एके काळी काम करणा-या एका भारतीयानेच केला असल्याचा दावा पाकिस्ताने केला होता. पण आज पाकिस्तानमधल्याच अन्सर-वा- मुहाजीर या तालिबानी संघटनेने या बॉंबस्फोटाची जबाबदारी स्वीकारली. पाकिस्तानने अमेरिकेला मदत करणं बंद नाही केलं तर आम्ही आणखी हल्ले करू, असंही या संघटनेने म्हटलं आहे.

close