लेखी आश्वासनामुळे अडला प्राध्यापकांचा बहिष्कार

April 9, 2013 9:59 AM0 commentsViews: 50

09 एप्रिल

महाराष्ट्रातल्या सीनिअर कॉलेजच्या शिक्षकांचा परीक्षेच्या कामावरचा बहिष्कार सुरु होऊन तब्बल 64 दिवस उलटलेत. पण राज्य सरकारनं कोणतंही लेखी आश्वासन न दिल्यामुळे आपल्या सर्व मागण्यांवर ठाम राहण्याचा निर्णय एमफुक्टो या संघटनेनं घेतला. एकीकडे प्राध्यापक संपावर ठाम असताना त्यांच्याबद्दल अधिवेशनात केले जाणारे ठराव लेखी कळवले जात नाहीत. तर दुसरीकडे, अजित पवार यांनी इंदापूर इथल्या कार्यक्रमात प्राध्यापकांच्या संपावर टीका केली आणि ही टीका करतानाही त्यांचा तोल सुटला. पण, एमफुक्टोला विरोध असणार्‍या महाराष्ट्र नेट-सेट पात्रता धारक समन्वय समितीच्या प्राध्यापकांच्या संघटनेने संपकरी प्राध्यापकांवर टीका केली.

close