26/11 नंतर महिनाभरात राज्याच्या सुरक्षेत वाढ

December 26, 2008 3:54 PM0 commentsViews: 1

26 डिसेंबरअमेय तिरोडकरमुंबईवरचा हल्ला सुरक्षा यंत्रणेतल्या त्रुटींमुळे झाला. त्यामुळे या यंत्रणा सक्षम करण्यासाठी जोरदार पावलं उचलण्यात येतायत. गेल्या एक महिन्यात सुरक्षेबद्दल झालेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा आयबीएन लोकमतनं घेतला आहे.देशाची सागरी सीमा कमजोर असल्याचं नेहमी म्हटलं गेलं आणि 26 नोव्हेंबरचा हल्ला नेमका याच मार्गाने झाला. त्यामुळेच या हल्लानंतर सगळ्यात अगोदर सागरी सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलंय. यातूनच मग कस्टम विभागाला पस्तीस नव्या बोटी देण्यात आल्या. याशिवाय राज्य सरकारने राज्य पोलिस दलाला अत्याधुनिक हत्यारे देण्यासाठी 127 कोटींच्या निधीची घोषणा केली. हा निधी नवी बुलेटप्रूफ जॅकेट्स, एके 47 बंदुका यांसाठीही वापरण्यात येणार आहे. ताजचा हल्ला मोडून काढला तो एनएसजीच्या जवानांनी. त्यामुळे राज्यातही त्याच्या तोडीचं फोर्स वन स्थापन करण्यात येईल, याची घोषणाही सरकारने केली आहे. या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून विलासराव आणि आर. आर. पाटील यांना राजीनामा द्यावा लागला. अशीच जबाबदारी अधिकार्‍यांनीही स्वीकारावी यासाठी दबाव वाढला होता. आता पोलिस महासंचालक ए.एन.रॉय आणि आयुक्त हसन गफूर यांच्या चौकशीचे आदेश सरकारला द्यावे लागले. याशिवाय राज्यातल्या नेत्यांना देण्यात येणार्‍या सुरक्षा व्यवस्थेची माहीतीही गृहमंत्री जयंत पाटील यांनी मागवलीय. त्यातून अनावश्यक तिथे सुरक्षा काढली जाईल असंही सांगितलं जात आहे.

close