‘देव तारी त्याला कोण मारी..’

April 5, 2013 11:40 AM0 commentsViews: 21

05 एप्रिल

देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात… असाच काहीसा प्रत्यय ठाण्याच्या या दुर्घटनेतही आला. ज्या दुर्घटनेनं आतापर्यंत 42 जणांचे बळी घेतले त्या दुर्घटनेत एक दीड वर्षांची चिमुकली सुखरूप बचावली. इमारतीचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू असताना बचाव कर्मचार्‍यांना ही मुलगी सापडली. ती तब्बल 18 तास ढिगार्‍याखाली होती. पण आश्चर्यकारकरित्या तिला कुठलीही गंभीर दुखापत झालेली नव्हती. तिला बाहेर काढताच जमलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवल्या. या मुलीला उपचारासाठी शिवाजी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. दरम्यान, शिवाजी हॉस्पिटलमध्ये दाखल एका चिमुकलीच्या पालकांचा पत्ता लागत नाहीय. एका व्यक्तीनं चार ते पाच वर्षांच्या या मुलीला वाचवलं आणि हॉस्पिटलमध्ये तिच्यासोबत आहे. मुलीला अनेक जखमा आहेत. तिच्यावर उपचारही सुरू आहेत. पण, तिचे वडील आणि चार भावंड सापडत नाही. ज्या व्यक्तीनं या मुलीला वाचवलं त्याच्या म्हणण्यानुसार या मुलीच्या आईलाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण, सकाळी तिचा मृत्यू झाला.

close