लक्ष्मण मानेंना 3 दिवसांची पोलीस कोठडी

April 9, 2013 12:36 PM0 commentsViews: 14

09 एप्रिल

लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले 'उपरा'कार लक्ष्मण माने यांना आज सातारा कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. लक्ष्मण माने यांनी कोर्टात आपली बाजू मांडली. पोलिसांनी या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी वेळ द्यावा अशी मागणी कोर्टात केली. सोमवारी लक्ष्मण माने 15 दिवसांनंतर पोलिसांना शरण आले होते. त्यानंतर आज सकाळी तब्येत बिघडल्यानं त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. लक्ष्मण मानेंची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना कोर्टात हजर केले जाणार नाही अशी शक्यता होती. मात्र संध्याकाळी डॉक्टारांची परवानगी घेऊन पोलिसांनी लक्ष्मण मानेंना कोर्टात हजर केलं. मानेंवर त्यांच्याच संस्थेतल्या तीन महिलांनी त्यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी केल्या आहेत. सोमवारी ते पोलिसांना शरण आले. शरण येण्यापूर्वी त्यांनी आयबीएन लोकमतला मुलाखत दिली. हे सगळं आपल्याविरुद्धचं षडयंत्र आहे, असा आरोप त्यांनी या मुलाखतीत केलाय. शिवाय हरी नरके, बाळकृष्ण रेणके आणि त्यांचे कुटुंबीय, तसंच मानेंच्या संस्थेतून निलंबित करण्यात आलेले काही शिक्षक या षड्‌यंत्रात सहभागी आहेत, असाही आरोप लक्ष्मण माने यांनी केला.

close