कोल्हापूरची स्नेहल झाली आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल रेफ्री

December 26, 2008 5:05 PM0 commentsViews: 19

26 डिसेंबर, कोल्हापूरप्रताप नाईकक्रिकेट जगतात भारत आपला ठसा उमटवत असताना आणखी एका क्षेत्रात भारतानं मानाचं स्थान पटकावलं आहे. जयपूर इथं नुकतीच आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल रेफरी परीक्षा घेण्यात आली आणि या परीक्षेत कोल्हापूरच्या स्नेहल बेंडकेनं बाजी मारली. त्यामुळे स्नेहल आता भारताची पहिली आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महिला रेफ्री ठरली आहे.बॉस्केटबालची आवड असणार्‍या स्नेहलनं या पुर्वी राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ठ खेळाचं प्रदर्शन केलय. याच दरम्यान भारतात महिला पंच कमी असल्याचं तीला जाणवलं आणि पंच बनण्यासाठीचा तीचा ओढा वाढला. त्यामुळे ती जिद्दीनं स्टेट लेव्हल आणि नॅशनल लेव्हलची पंच परीक्षा उत्तीर्ण झाली आणि आता फेडरेशन इंटरनॅशनल डी बास्केटबॉल असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल पंच परिक्षेत यश संपादन केलं."आता आयपीएलप्रमाणेच इंडियन बास्केट बॉल लिग सुरु होत आहेत.जसा क्रिकेट आणि फुटबॉल फेमस गेम आहे.तसा तसाच या थोड्या वर्षात बस्केट बॅलही त्या लेव्हलवर येवुन पोहचेल" असं स्नेहलनं सांगितलं.स्नेहलला यासाठी घरातुन प्रोत्साहान तर मिळालच, शिवाय प्रशिक्षक शरद बनसोडे यांचही चांगलं मार्गदर्शन लाभलं. "हिच्याकडं रेफ्री म्हणून असणारे सगळे गुण आहेत. ती चपळ आहे. तीच्याकडे डिसिजन मेकींग अ‍ॅबीलीटी आहे.आणि महत्वाच जे सगळ्यात स्मार्टनेस आहे." असं शरद बनसोडे यांनी सांगितलं.या पुढे स्नेहल पंच म्हणून काम करत असताना बास्केटबॉल खेळाडू घडवण्याचा स्नेहलचा निर्धार आहे.

close