ठाण्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई

April 9, 2013 3:36 PM0 commentsViews: 19

09 एप्रिलशिळफाटा इमारत दुर्घटनेनंतर ठाणे महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामांविरूद्धच्या कारवाईला आता सुरूवात केली. उशिरा का होईन पण ठाणे महापालिकेला जाग आली. आज दुपारपासून बेकायदा इमारती पाडण्याचं काम सुरू झालंय. ठाणे महापालिकेनं सुरू केलेल्या या कारवाईतल्या पहिल्या टप्प्यात एकूण 250 इमारतींवर कारवाई होणार आहे. तसंच 47 बेकायदा इमारतींचं पाणी बंद करण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्तांनी दिलेत. पण, या धडक कारवाईमुळे घर गमावलेल्या लोकांवर जायचं कुठे हा प्रश्न उभा ठाकलाय. दरम्यान, मुंब्रा लकी कंपाऊंड बिल्डिंग दुर्घटना प्रकरणी ठाणे महापालिकेच्या दोन इंजिनिअर्सना आज अटक करण्यात आली. रमेश इनामदार आणि सुभाष राहूल यांना क्राईम ब्रांचनं अटक केली. दोघांनाही उद्या ठाणे कोर्टात हजर केलं जाणार आहे.

close