मायावतींना टार्गेट करू नका – शकील अहमद

December 26, 2008 5:10 PM0 commentsViews: 6

26 डिसेंबर, उत्तरप्रदेशउत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री मायावतींच्या वाढदिवसाच्या निधीतून झालेल्या खूनप्रकरणी काँग्रेसनं आता सावध भूमिका घेतली आहे. हे प्रकरण मीडियानंच तापवलंय, असं आता केंद्रीय गृह राज्यमंत्री शकील अहमद, यांनी म्हटलंय. इंजिनिअर मनोज गुप्ता यानं मायावतींच्या वाढदिवसाच्या निधीसाठी 50 लाख रुपये द्यायला नकार दिला. त्यामुळं बहुजन समाज पक्षाचा आमदार शेखर तिवारी यानं गुप्ता यांचा खून केला, असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय. या घटनेचं मोठं राजकारण सुरू झालं. सुरुवातीला समाजवादी आणि काँग्रेस पक्षानं याप्रकरणाच्या विरोधात आघाडी उघडली. पण नंतर काँग्रेसनं आपल्या भूमिकेपासून घूमजाव केलं. राहुल गांधी यांनी या मुद्द्याचं राजकारण करू नये, असं आवाहन केलं. तर आता मीडियानंच हे भूत उभं केल्याचं केंद्रीय गृहराज्य मंत्री म्हणत आहेत.

close