जनार्दन चांदूरकर यांच्याशी बातचीत

April 4, 2013 4:03 PM0 commentsViews: 44

04 एप्रिलगटातटाचं राजकारण बाजूला सारून मुंबईतली काँग्रेस अधिक मजबूत करण्यावर भर देऊ असा विश्वास नवनियुक्त मुंबईचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांनी व्यक्त केला. माजी आमदार ऍडव्होकेट जनार्दन चांदूरकर यांची मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीची घोषणा आज नवी दिल्लीत करण्यात आली. माजी मुख्यमंत्री दिवंंगत विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे चांदूरकर मुंबईतले दलित नेते आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन चांदूरकर यांची निवड करण्यात आलीय. अध्यक्षपदाच्या शर्यतीत चांदूरकर यांनी चंद्रकांत हंडोरे, मधू चव्हाण आणि भाई जगताप यांना मागे पाडलं. चांदूरकर यांच्या नियुक्तीच्या निमित्तानं विलासराव देशमुख गट पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे.

close