प.बंगालच्या अर्थमंत्र्यांना SFI च्या कार्यकर्त्यांची धक्काबुक्की

April 9, 2013 4:48 PM0 commentsViews: 8

09 एप्रिल

दिल्लीत योजना भवनमध्ये पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांना स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. एसआयच्या कार्यकर्त्यांनी मित्रा यांचे कपडे फाडले आणि त्यांच्या छातीवर बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी कार्यकर्त्यांनी मित्रा यांच्या विरोधात घोषणाही दिल्या. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मित्रा हे आज नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलूवालिया यांच्या भेटीसाठी आज दिल्लीत आले होते. यावेळी घडलेल्या या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही चिडल्या. अखेर अहलुवालिया यांना माफी मागावी लागली. दरम्यान मित्रा यांना धक्काबुक्की करणार्‍या एसएफआयच्या कार्यकर्त्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.

close