इम्पॅकटफुल 5 वर्ष : ‘विठ्ठला’च्या दारावरचे बनलो पहारेकरी !

April 6, 2013 1:31 PM0 commentsViews: 56

06 एप्रिल

बातम्या तर सारेच दाखवतात पण आम्ही त्यासोबत घेतो बातमीमागच्या बातमीचा वेध..अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणार्‍या पंढरपुरच्या विठ्ठलमूर्तीच्या लेपणाबाबतच्या अनास्थेची बातमी आयबीएन लोकमतनं जनेतसमोर आणली. आणि हा प्रश्न तडीस जाईपर्यंत त्याचा पाठपुरावाही केला. पंढरपुरचं विठ्ठल मंदीर… अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत… विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांची रोज हजारोंनी होणारी गर्दी…आणि मुर्तीवर होणारे महाअभिषेक …याच महाअभिषेकामुळे मुर्तीची होणारी झीज टाळण्यासाठी मंदीर व्यवस्थापनांनी खाजगी तज्ज्ञांची मदत घेण्याचं ठरवलं. विठ्‌ठलाच्या मुर्तीचं संवर्धन खाजगी माध्यमातून केल्यास मूर्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. आयबीएन लोकमतनं ही बाब जनतेसमोर आणली. वाढत्या दबावामुळे व्यवस्थापनानं ही आपला निर्णय बदलत केंद्र सरकारच्या पुरातत्वविभागाकडून अखेर रासायनिक प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आणि विठ्ठलाच्या मूर्तीचा धोका टळला. आम्ही केवळ बातमीदाखवून थांबलो नाही तर त्याचा सातत्यानं यशस्वी पाठपुरावाही केला.

close