बंगलोरचा सनरायजर्सवर ‘विराट’ विजय

April 9, 2013 5:27 PM0 commentsViews: 50

08 एप्रिल

बंगलोर रॉयल चॅलेंजर्सनं सनरायजर्स हैदराबादचा 7 विकेटनं पराभव करत पहिल्या मॅचमधल्या पराभवाचा वचपाही काढला. विराट कोहलीच्या कॅप्टन इनिंगच्या जोरावर बंगलोरनं दुसर्‍या विजयाची नोंद केली. पहिली बॅटिंग करणार्‍या सनरायजर्सनं 161 रन्स केले. कॅमेरुन व्हाईट आणि थिसारा परेरानं फटकेबाजी केली. याला उत्तर देताना बंगलोरची सुरुवात खराब झाली. मयांक अग्रवाल आणि ख्रिस गेल झटपट आऊट झाले. पण यानंतर आलेल्या कॅप्टन विराट कोहलीनं मॅचची सूत्र आपल्या हातात घेतली. फोर आणि सिक्सची बरसात करत कोहलीनं 18 व्या ओव्हरमध्येच टीमला शानदार विजय मिळवून दिला.

close