एटीएसकडून हिमानी सावरकरांची चौकशी

December 26, 2008 5:18 PM0 commentsViews: 3

26 डिसेंबर, पुणेमालेगांव बॉंम्ब स्फोटप्रकरणी एटीएसने हिमानी सावरकर यांची पुण्यात चौकशी केली. अभिनव भारत संघटनेच्या त्या अध्यक्षा आहेत. या प्रकरणातील आरोपी स्वाध्वी प्रज्ञासिंग आणि दयानंद पांडे यांना मदत करण्याची त्यांनी घोषणा केली होती. या प्रकरणात अटक केलेले काही आरोपी अभिनव भारतचे सदस्य असल्याचं स्पष्ट झाल्यामुळं या चौकशीला महत्व प्राप्त झालं आहे. एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉमेबस्फोटप्रकरणी हिंदू दहशतवादाचा प्रकार उघड केला होता. मात्र मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात त्यांचा दुदैर्वी अंत झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास थंडावल्याचा आरोप केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर हिमानी सावरकर यांची चौकशी महत्त्वाची मानली जात आहे.

close