दिल्लीचा धुव्वा, मुंबईने ‘गड’ राखला

April 9, 2013 6:04 PM0 commentsViews: 14

09 एप्रिल

आयपीएलमध्ये घरच्या मैदानावर खेळणार्‍या मुंबई इंडियन्सनं 'दुनिया हिला देंगेचा नारा' खरा करुन दाखवत दमदार विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनं दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 44 रन्सनं धुव्वा उडवला. मुंबईचा हा दुसरा विजय तर दिल्लीची पराभवाची हॅट्ट्रिक झालीय. दिनेश कार्तिक आणि रोहित शर्माच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबईनं 210 रन्सचं बलाढ्य टार्गेट दिल्लीसमोर ठेवलं. यंदाच्या आयपीएलमधला हा हायेस्ट स्कोर ठरला. सचिन आणि पॉण्टिंग झटपट आऊट झाल्यावर मैदानावर आलेल्या दिनेश कार्तिकनं दिल्लीच्या बॉलर्सवर हल्लाबोल करत स्कोर वाढवला. तर कार्तिक आऊट झाल्यावर रोहित शर्मानं फटकेबाजी करत मुंबईला 200 रन्सचा टप्पा पार करुन दिला. आशिष नेहराच्या शेवटच्या ओव्हरमध्ये रोहितनं तीन सिक्स मारले. याला उत्तर देताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. उन्मुक्त चंद पहिल्याच बॉलवर आऊट झाला. यानंतर डेव्हिड वॉर्नर वगळता इतर बॅट्समन मुंबईच्या बॉलिंगसमोर गारद झाले.

close