‘मी निर्दोष, जर दोषी आढळलो तर फाशी द्या’

April 8, 2013 4:08 PM0 commentsViews: 33

08 एप्रिल

मी आयुष्यात असं कधी चुकीचं कृत्य केलं नाही आणि मरेपर्यंत असं कधीच करणार नाही. ज्या परिस्थिती मी वाढलो जे माझ्यावर संस्कार झाले त्यातून असं काही मी शिकलो नाही. हे माझ्या विरोध षडयंत्र आहे. प्रा.हरी नरके, बाळकृष्ण रेणके, पल्लवी रेणके आणि माझ्याच संस्थेचे व्यंकप्पा भोसले यांच्यासह काही शिक्षक या षडयंत्रात सहभागी आहेत असा आरोप लक्ष्मण माने यांनी केला. खरं सत्य पडताळून पाहण्यासाठी सीआयडी चौकशी करावी. ज्या महिलांनी माझ्यावर आरोप केले आहे त्यांचीही चौकशी व्हावी जर दोषी आढळलो तर मला शनिवारवाड्यावर फाशी द्या असंही माने यांनी म्हटलंय. पोलिसांना शरण येण्यापूर्वी त्यांनी आयबीएन लोकमतला मुलाखत दिली.

ते पुढे म्हणाले, एखाद्या व्यक्तीला सामाजिक आयुष्यातून उठवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे.जेंव्हा बाळकृष्ण रेणके यांच्या रेणके समितीचा आमच्या संघटनेला विरोध होता. तेंव्हा आम्ही रेणके समितीचा कडाडून विरोध केला. राज्यभर आम्ही रेणके समितीच्या अहवालाची होळी केली. आणि मी 2003 साली बौद्ध धर्म स्विकारण्याचा निर्णय जाहीर केला तेंव्हापासून मला बदनाम करण्यात कट रचला जात होता. या कटात प्रा.हरी नरके, बाळकृष्ण रेणके, पल्लवी रेणके आणि माझ्या संस्थेचे व्यंकप्पा भोसले हे सहभागी आहे. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आमच्या संस्थेच्या घटनेला मंजूर दिली तेंव्हा भटक्या विमुक्त जमातीचा व्यक्तीच संस्थेचा अध्यक्ष होऊ शकतो असं नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळे यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि त्यांना असं वाटतं की, लक्ष्मण मानेला बाजूला हटवले तर कोट्यावधीची संपत्ती आपल्या हातात येईल असं त्यांना वाटतंय असा आरोप माने यांनी केला. आज संस्थेची कोट्यावधीची संपत्ती आहे. 70 एकर जागा आहे पणही काही माझी संपत्ती नाही. ती संस्थेची आहे. रेणके यांचा भाच्चा शिवाजी कोडवी याने संस्थेला खूप त्रास दिलाय. त्यांने वीस वर्षापूर्वी ज्यांना काढून टाकले आहे त्या महिला,पुरूषांना बळजबरीने संस्थेत सहभागी करून घेतलं आहे. मी स्वत: अध्यक्षांना या बद्दल वारंवार कळवले एव्हान मी वैतागून मला संस्थेच्या जबाबदारीतून मोकळे करा अशी विनंतीही केली होती. पण दोन-तीन जण त्रास देताय म्हणून हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान कशाला करतोय असं समजावून सांगितले. पण हा सगळा डावपेच रचला गेलाय त्यामुळे माझ्यावर विनाकारण आरोप केले गेले आहे जर सत्य पडताळून पाह्याचे असेल तर सीआयडी चौकशी करावी. ज्या महिलांनी माझ्यावर आरोप केले आहे त्यांचीही चौकशी व्हावी जर दोषी आढळलो तर मला शनिवारवाड्यावर फाशी द्या असंही माने म्हणालंे. आज लैंगिक अत्याचार आरोप प्रकऱणी लक्ष्मण माने पंधरा दिवसांनी सातारा पोलिसांना शरण आले आहेत. गेले पंधरा दिवस त्यांचा कुठेच पत्ता लागत नव्हता. समाजातल्या विविध स्तरातून ते फरार झाल्याबद्दल टीका होत होती, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना आवाहन केल्यानंतर अखेर लक्ष्मण माने पोलिसांना शरण आले. लक्ष्मण माने यांच्याविरुद्ध त्यांच्याच संस्थेतल्या सहा महिलांना लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी केलेल्या आहेत.

close