नेटवर्क 18च्या कार्यक्रमात मोदींनी दिला ‘P4’चा मंत्र

April 8, 2013 5:39 PM0 commentsViews: 35

08 एप्रिल

नेटवर्क 18च्या 'थिंक इंडिया डायलॉग' या कार्यक्रमात गुजरातचे मुख्यमंत्री मोदी यांनी सुशासनाबद्दलची आपली मतं मांडली. यावेळी त्यांनी विकासाचं P4 म्हणजे 'पिपल-पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशीप' हे मॉडल मांडलं. विकास साधायचा असेल तर सार्वजनिक-खाजगी भागीदारीत सामान्यांचाही सहभाग असावा, असं त्यांचं मत आहे. यावेळी बोलताना केंद्र सरकार निधी वाटपात पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप केला. खाजगीकरणाला आपला विरोध नसला तरी किराणा आणि संरक्षण क्षेत्रातल्या एफडीआय(FDI)ला विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शेजारी राष्ट्र आणि इतर राष्ट्र यांचा व्यवहार सांभाळण्यासाठी संरक्षण विभागाचे विभाजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. चीनची तुलना करता लोकशाही आणि तरुणांची मोठी संख्या ही भारताची शक्तिस्थानं असल्याचंही त्यांनी म्हटलंय. विकासासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण अतिशय गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय. जाचक नियम आणि कायद्यांमुळे कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

close