दहशतवादाविरोधात जाहीरनामा

December 26, 2008 5:41 PM0 commentsViews: 3

26 डिसेंबर26/11 सारख्या घटना पुन्हा घडू नयेत. अतिरेकी हल्ले थोपवण्यात यश यावं म्हणून नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. सीएनएन आयबीएन आणि हिंदुस्थान टाईम्स यांनी यात पुढाकार घेतला होता. रेणूका आज सकाळी नागरिकांचा हा जाहीरनामा गृहमंत्री पी चिदंबरम यांच्याकडे सोपवण्यात आला. हजारो नागरिकांनी पाठवलेल्या सुचनांमधून दहा निवडक मागण्यांचा समावेश यात करण्यात आलाय. आरती माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, मेजर जनरल अफसीर करीम आणि जम्मू युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू अमिताभ मट्टू यांची एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. असा आहे जाहीरनामा दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची क्षमता वाढवावीआपत्कालीन संकटाचा सामना करण्याचं प्रशिक्षण सर्वसामान्य नागरिकांना मिळावंदहशतवादाविरोधात लढण्यासाठी उद्योग जगतातून पैसे उभारण्यात यावेतप्रत्येक नागरिकाला इलेक्ट्रॉनिक आयडेंटिटी कार्ड देण्यात यावंदहशतवादाचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक टेक्नोलॉजीचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावाप्रशिक्षित नागरिकांची सुरक्षा आणि टेहळणी पथकं बनवावीतकिनार्‍यावरील सुरक्षेत वाढ करण्यासाठी स्थानिक नागरिकांना सहभागी करण्यात यावं भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती टाळावीपोलीस यंत्रणा आधुनिक करण्याला प्राधान्य देण्यात यावं आपत्कालीन स्थितीवर मार्गदर्शन करण्यासाठी एक 'वॉर बुक' बनवण्याची गरज

close