मुंडेंची एक रात्र चारा छावणीतली !

April 10, 2013 5:21 PM0 commentsViews: 252

सिद्धार्थ गोदाम, बीड

10 एप्रिल

औरंगाबादमधलं उपोषण सोडल्यानंतर भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी एक रात्र घालवली बीड जिल्ह्यातल्या चारा छावणीत. जिल्ह्यातल्या आष्टी इथली ही चारा छावणी…बीडचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी एक रात्र आणि दुसर्‍यादिवसाची सकाळ तिथल्या चारा छावणीवर घालवली..मुंडेंच्या गाड्यांचा ताफा पोहचला चारा छावणीच्या गावात…तिथं मुंडेंनी उपस्थित शेतकर्‍यांसमोर भाषण ठोकलं आणि गावातल्या एका घरी जाऊन त्यांनी तिथला पाहुणचार घेतला. त्यानंतर ते थेट पोहचले चारा छावणीत..ती रात्र चारा मुंडेंनी चारा छावणीतच काढली.

कदाचित अनेक वर्षांनी मुंडेंनी गावात अशी रात्र आणि लोकांच्या सान्निध्यात घालवली असेल. अर्थात कुठल्याही नेत्यांची सकाळ सुरु होते, ती वर्तमानपत्राच्या वाचनानं..त्यानंतर मुंडेंनी स्वच्छ आणि मोकळ्या हवेत दात घासण्याचाही आनंद घेतला. त्यानंतर चहा आणि उपस्थित शेतकर्‍यांबरोबर मनमोकळ्या गप्पा…

गावातल्या शेतकर्‍याला सकाळी-सकाळी उत्तम न्याहारी लागते, तशी मस्त न्याहारी मुंडेंनीही त्यांच्यासाठी उभ्या केलेल्या तंबूत बसून घेतली आणि त्यानंतर सुरु झाला, त्यांचा पुढचा प्रवास…पण हे सगळं करण्यामागे मुंडेंचं राजकारण लपून राहत नाही, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंडेंनी माणसांची जमवाजमव आत्तापासूनच सुरु केलीय. त्याची ही झलक होती. कदाचित इथून ह्याच गाड्यांच्या ताफ्यात सुरु झालेला मुंडेंचा प्रवास पुढे झंझावती होऊन,राज्याच्या सत्तेजवळ नेणार का, हाच खरा प्रश्न आहे.

close