अजित पवारांच्या वक्तव्यावरून विधिमंडळात गदारोळ

April 10, 2013 10:03 AM0 commentsViews: 51

10 एप्रिल

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावरून विधानसभेत आजही गदारोळ झाला आणि त्यानंतर दिवसभरासाठी दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधकांनी आज पुन्हा आक्रमक पवित्रा धारण करत अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. ते या मागणीवर ठाम राहिले. विरोधक आक्रमक झाल्यानं प्रश्नोत्तराचा तास रद्द करावा लागला. अजित पवारांच्या वक्तव्यावर चर्चा करावी आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी असा आग्रह विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी धरला होता. पण मुख्यमंत्र्यांनी माफी मागू नये असा दबाव राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर येतोय त्यामुळे विरोधक अजित पवारांच्या राजीनाम्यावर आक्रमक झालेत.

close