मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही आंदोलकांकडे दुर्लक्ष

April 10, 2013 10:21 AM0 commentsViews: 7

10 एप्रिल

5 फेब्रुवारीपासून मुबंईच्या आझाद मैदानात आंदोलन करणार्‍या सोलापूरच्या शेतकर्‍यांचं म्हणणं अजूनही सरकारनं ऐकून घेतलेलं नाही. मंगळवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या पीएनं आंदोलनाचं नेतृत्व करणार्‍या भैय्या देशमुख यांना फोन केला आणि संध्याकाळी मुख्यमंत्री भेट देतील असं आश्वासन दिलं असा भैय्या देशमुख यांचा दावा आहे. पण प्रत्यक्षात, आज सकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांनी भेट न दिल्यामुळे सकाळी 9 वाजता या शेतकर्‍यांनी मलबार हिल उपोषण आणि ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यानंतर दोन तासांतच पोलिसांनी या आंदोलकांना मलबार हिल इथून ताब्यात घेतलं आणि त्यांची रवानगी पुन्हा एकदा आझाद मैदानं इथं केलं. हायकोर्टाने राज्य सरकारला इतर धरणांमधून उजनीत पाणी सोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. 24 तासात या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिलेत. त्यानंतर 9 तालुक्यांतल्या या शेतकर्‍यांच्या सर्व समस्या मुख्यमंत्र्यांकडे मांडायच्या होत्या. मात्र त्यांना आतापर्यंत पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनीही भेट दिलेली नाही. मुख्यमंत्र्यांची भेटही त्यांना नाकारण्यात आली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर केलेल्या बेताल वक्तव्यामुळे आता हे आंदोलन आणखीनच चर्चेत आलंय.

close