सरकारला चपराक, उजनीत पाणी सोडण्याचे कोर्टाचे आदेश

April 10, 2013 10:27 AM0 commentsViews: 11

10 एप्रिल

उजनी धरणातल्या पाण्याच्या मुद्द्यावरून मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला चपराक लगावलीय. दुष्काळात होरपळणार्‍या सोलापूरच्या जनतेला पाणी मिळावं, यासाठी इतर धरणांमधून उजनीत पाणी सोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. 24 तासात या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिलेत. या प्रकरणाची पुढची सुनावणी 15 एप्रिलला होणार आहे. उजनी धरणात पाणी सोडावं, यासाठी सोलापूरचे शेतकरी गेल्या 65 दिवसांपासून मुंबईतल्या आझाद मैदानात धरणं आंदोलन करत आहेत. या आंदोलकांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्वाच्य भाषेत टर उडवली होती. 'पाणीच नाही तर मुतता का तिथे' अशा शब्दात पवारांनी आंदोलकांवर टीका केली होती. आता कोर्टानेच उजनीत पाणी सोडण्याचे आदेश दिल्यामुळे अजित पवारांना चांगलाच दणका दिलाय.

close