ब्रिटिश नाटककार हॅरॉल्ड पिंटर कालवश

December 27, 2008 4:00 AM0 commentsViews: 8

26 डिसेंबर, मुंबई ब्रिटिश नाटककार हॅरॉल्ड पिंटर यांचं कॅन्सरनं निधन झालं. ते ते 78 वर्षांचे होते. 10 ऑक्टोबर 1930 मध्ये पूर्व लंडनमध्ये जन्माला आलेले हॅरॉल्ड पिंटर लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, कवी, सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना 2005 मध्ये साहित्यासाठीच्या नोबल पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. www.haroldpinter.com या वेबसाईटवर त्यांची संपूर्ण माहिती पहायला मिळते. पिंटर यांचा राजकीय वर्तुळात सक्रीय वावर होता. म्हणूनच इराकी युद्धाच्या विरोधात त्यांनी खूप मोठं कॅम्पेनिंग केलं होतं. त्यांच्या निधनानं साहित्य तसंच कला क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्याचबरोबर त्यांच्यासारखा संवेदनशील माणूसही आपण गमावलेला आहे.

close