‘शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यास पंतप्रधान अयशस्वी’

April 10, 2013 11:31 AM0 commentsViews: 17

10 एप्रिलनागपूर विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी कापसाचे हमी भाव आणि आयात शुल्क वाढवण्याची गरज असतांना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दुर्लक्ष केला असा दावा विकिलिक्सच्या नव्या केबलमध्ये करण्यात आला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग हे 30 जून ते 1 जुलै 2006 ला विदर्भाच्या दौर्‍यावर आले होते. पण या दौर्‍यामध्ये त्यांनी या दोन्ही मुद्यांकडे दुर्लक्ष केल्याचाही दावा केबलमध्ये करण्यात आला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना आणण्याऐवजी फक्त मलमपट्टी केल्याचा गौप्यस्फोट विकिलिक्सने केला आहे. अमेरिकन लायब्ररीने काही वर्षांपुर्वी विदर्भात दौरा करून शेतकर्‍यांच्या आत्महत्येसंदर्भात माहिती घेतली होती. भारताच्या अमेरिकन दुतावासाने हीच माहिती अमेरिकाला पाठवली होती. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीतील घोटाळा आणि अनफेअर ट्रेड प्राक्टीसेस करणार्‍या अमेरिकेतल्या बियाणं उत्पादन करणार्‍या कपंनीच्या फायद्यासाठी सरकारनं कर्जमाफीची योजना आणली असा गौप्यस्फोट करणारी केबलही लवकरच विकिलिक्स जाहीर करण्याची शक्यता शेतकर्‍यांचे नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.

close