सुब्रतो रॉय सेबीसमोर हजर

April 10, 2013 12:02 PM0 commentsViews: 5

10 एप्रिल

सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय आणि सहाराचे प्रमुख अधिकारी आज सेबीसमोर हजर झाले. या चौकशीनंतर सुब्रतो रॉय यांनी सेबीवरच आरोप केले. गुंतवणूकदारांची ओळख पटवण्यात सेबी उगाच वेळखाऊपणा करतंय. त्यामुळे गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्यात उशीर होत असल्याचं त्यांचं म्हणणंय. आपल्या व्ययक्तिक मालमत्तेविषयीच सेबीशी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दुसरीकडे मुंबईतल्या आर्थिक गुन्हे शाखेनं सहारा समूहाच्या विरोधात तपास सुरू केलाय. सहारा समुहावर गुंतवणुकदारांचे 24 हजार कोटी परत न केल्याचा आरोप आहे.

close