अजित पवारांच्या बुद्धीचं दिवाळं निघालं -बाबा रामदेव

April 10, 2013 11:21 AM0 commentsViews: 36

10 एप्रिल

कोणी देशाला मधमाशाचं पोळं म्हणतंय तर कुणी मुतण्याचं उदाहरण देतंय. राजकारण्यांच्या बुद्धीचं काय दिवाळं निघालंय की काय अशा शब्दात योगगुरू रामदेव बाबा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली. महाराष्ट्रातल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रामदेवबाबा जालन्यात आले होते. काल त्यांनी जालना जिल्ह्यातली उज्जेनपुरी आणि भाकरी ही दोन गावं दत्तक घेतली. या दोन गावांसह त्यांनी आत्तापर्यंत राज्यातली एकूण 9 गावं दत्तक घेतली.

close