‘राजीनाम्याचा निर्णय आमदारांशी चर्चा करून घेऊ’

April 11, 2013 11:46 AM0 commentsViews: 27

11 एप्रिल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वादग्रस्त विधानानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करून विधिमंडळाचं कामकाजही होऊ दिलं नाही. आणि याच गदारोळाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पहिल्यांदाच या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. राजीनाम्याबाबत आपण आमदारांशी चर्चा करून मगच निर्णय घेऊ असं पवार यांनी म्हटलंय. मी सभागृहात आणि बाहेर माफी मागितली त्यामुळे विरोधकांनी आता जास्त ताणून धरू नये असं आवाहनही अजित पवारांनी केलं.

close