लाचखोर 36 पोलीस निलंबित

April 11, 2013 11:55 AM0 commentsViews: 36

11 एप्रिल

एका स्टिंग ऑपरेशनमध्ये पोलीस आणि बेकायदा बांधकाम करणारे बिल्डर्स यांच्यातील लागेबांधे उघड झाल्यावर सरकारने तब्बल 36 पोलिसांना निलंबित केलंय. कुर्ला भागात बेकायदा बांधकाम करू देण्यासाठी पोलीसच लाच घेताना या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळून आले आहेत. गेल्याच आठवड्यात ठाण्यात शिळफाट्याजवळ इमारत कोसळून 74 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. दरम्यान, इतक्या सगळ्या पोलिसांवर कारवाई होत असण्याची ही पहिलीच वेळ आहे असं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी म्हटलंय. या प्रकरणात जर वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असंही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

close