विक्रोळीत मॅनहोलमध्ये पडून लहान मुलीचा मृत्यू

December 27, 2008 6:53 AM0 commentsViews: 1

27 डिसेंबरगोविंद तुपेबुधवारी विक्रोळीमध्ये एका अडीच वर्षाच्या मुलीचा, मॅनहोलमध्ये पडुन मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या म्हाडाच्या अधिकार्‍यांना या घटनेची साधी माहितीही तीन दिवसांनतर मिळाली. म्हाडाच्या गलथानपणाचा परीणाम मात्र सामान्य कुटुंबाना भोगावा लागतोय. मुळचं बीड जिल्ह्यातलं सुनिता श्रीसागरचं कुटुंब. पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत ते दीड वर्षा पुर्वी आले. विक्रोळीतल्या गार्डनचा आसरा घेऊन जीवन जगत होते. पण अचानक बुधवारी दुपारी त्यांच्या अडीच वर्षांच्या चिंगीचा ड्रेनेज लाईनमध्ये पडून मृत्यू झाला. चिंगीच्या मृत्यूमुळे तिची आई दु:खात बुडून गेली आहे.या दुदैर्वी घटने बाबत आयबीएन लोकमतने म्हाडाच्या संबधित अधिकार्‍यांना विचारलं. तेव्हा त्यांची उत्तर त्यांचा निष्काळजीपणा दाखवणारीच होती. "मी इथे आजच आलो आहे. मला या प्रकाराबाबत कसलीच माहिती नाही. इथे जे ऑफिसर होते, त्यांना विचारा" असं उत्तर म्हाडाचे इंजिनियर एस. के. ठाकूर यांनी दिलं.अशी उत्तर देण्यार्‍या अधिकार्‍यांना अशा घटनांची माहिती देखील नसते. त्यांच्या गलथान कारभारामुळे सर्वसामान्यांना केवढी मोठी किमत मोजावी लागतेे याची त्यांना जाणीवही नाहीये. अशाच निर्ढावलेल्या प्रशासनामुळं सामान्यांना आपला जीव गमवावा लागतोय.अशा घटना वारंवार घडत असतात. त्यावर अनेकवेळा प्रश्न उठतात. पण त्याकडे गांभीर्यानं बघणार कोण? विकासाच्या नावाखाली चाललेल्या अशा भोंगळ कारभाराचे बळी ही चिमुकली ठरत आहेत.

close