आर.आर.पाटील यांच्यावर बेळगावात गुन्हा दाखल

April 10, 2013 1:18 PM0 commentsViews: 12

10 एप्रिल

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यावर बेळगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. किरण ठाकूर यांच्या सत्कार समारंभात केलेल्या भाषणामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कार्यक्रमात आर.आर.पाटील यांनी बेळगावातून मराठी लोकांना निवडून द्या असं आवाहन केलं होतं. पाटील यांच्या भाषणामुळे मराठी आणि कानडी भाषकांमध्ये तेढ वाढल्याचा बेळगाव पोलिसांनी दावा केला.

close