सुदानमध्ये शहिदांचे पार्थिव आज भारतात आणणार

April 10, 2013 1:23 PM0 commentsViews: 13

10 एप्रिल

दक्षिण सुदानमध्ये बंडखोरांनी मंगळवारी केलेल्या हल्ल्यात 5 भारतीय जवान शहीद झाले होते. यात एका कर्नलचाही समावेश आहे. या पाचही जवानांवर आज पोस्टमार्टम करण्यात येईल. त्यानंतर आजच रात्री त्यांचे पार्थिव भारतात आणले जाणार आहेत. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले दोन जवानही उपचारासाठी भारतात परतणार आहेत. बंडखोरीमुळे असंतोष पसरलेल्या दक्षिण सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांतर्फे शांतीसैन्य शांतता प्रस्थापनेचं काम करतंय. त्यात मोठ्या प्रमाणावर भारतीय जवान आहेत. अमेरिकेनंही शांतीसैन्यावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध केलाय आणि निष्पक्ष तपास व्हावा, असे आदेश सुदान सरकारला दिले आहेत.

close