विदर्भावर अन्याय होत असल्याचा काँग्रेस आमदाराचा आरोप

December 27, 2008 7:02 AM0 commentsViews: 2

27 डिसेंबर, नागपूरप्रशांत कोरटकरनापिकीमुळे विदर्भातला शेतकरी हवालदील झालाय. पण सरकारला त्यांकडे लक्ष द्याला वेळ नाहीय, असा आरोप काँग्रेसच्याच आमदार नाना पटोले यांनी केला आहे. लाखानदूरचे आमदार पटोले यांनी अखेर शुक्रवरी रात्री आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसला घरचा आहेर दिला."सरकार कोणाचंही असो, विदर्भावर कायमच अन्याय होतो. विदर्भात शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालं, मात्र त्याची दखलही घेतली नाही. पश्चिम महाराष्ट्रात जरा काही झालं की लगेच मदत दिली जाते, मात्र विदर्भात गरजेची असतानाही मदत दिली जात नाही. मी शेतकर्‍यांचं प्रतिनिधित्व करतो आणि म्हणून मला हे पटत नाही. त्याचा निषेध म्हणून मी राजीनामा दिला आहे" असं नाना पटोले यांनी सांगितलं.

close