दंगल प्रकरणी जगदीश टायटलर अडचणीत

April 10, 2013 1:41 PM0 commentsViews: 22

10 एप्रिल

1984 च्या दंगलीप्रकरणी काँग्रेसचे नेते जगदीश टायटलर अडचणीत आलेत. त्यांच्याविरोधातला खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिल्लीतल्या कोर्टाने दिले आहेत. 1984 च्या शीखविरोधी दंगलीत 3 लोकांच्या हत्येप्रकरणात टायटलर यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता. पण 2009 मध्ये सीबीआयने सादर केलेल्या रिपोर्टमध्ये टायटलर यांना क्लीन चिट देण्यात आली होती. पण कोर्टाने सीबीआयचा हा रिपोर्ट फेटाळलाय आणि या प्रकरणात पुढची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. आता दंगलीतल्या टायटलर यांच्या भूमिकेची पुन्हा चौकशी होणार आहे.

close