ताडोबाच्या जंगलात बिबट्याच्या हल्ल्यात दोन ठार

April 10, 2013 2:16 PM0 commentsViews: 64

10 एप्रिल

चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबालगतच्या जंगलात बिबट्यानं अर्ध्या तासाच्या अंतरात दोन जणांना ठार केल्यानं खळबळ उडालीय. गेल्या दहा दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात चंद्रपूर जिल्ह्यात 4 जण ठार झाले आहेत त्यामुळे ग्रामीण भागात दहशत पसरलीय. आज सकाळी मोहरली वनपरिक्षेत्रात नगादरीच्या जंगलात तुकाराम मोह फु लं वेचायला गेले होते. तेव्हा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ते ठार झाले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी पोलीस आणि वनधिकारी यांच्यासह गावकरीही सोबत गेले. त्यावेळी झुडपात लपून बसलेल्या बिबट्यांना हल्ला चढवला. या हल्ल्यात एका महिला ठार झाली. या घटनेमुळ परिसरात घबराट पसरलीय.या नरभक्ष बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने दोन पिंजरे लावले आहेत.

close