सेना आमदार आणि राणे समर्थकांची खडाजंगी

December 27, 2008 7:20 AM0 commentsViews: 3

27 डिसेंबर, नागपूरआशिष जाधवसिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या खनिज उत्खननावरुन विधानसभेत शुक्रवारी गोंधळ झाला. या प्रश्नावरून सेना आमदार आणि राणे समर्थकांमध्ये चांगलीच जुंपली. अखेर अध्यक्षांनाच या प्रकारावर तोडगा काढायची वेळ आली. सिंधुदूर्गमधल्या खनीज उत्खननामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झालाय. नागरिकांच्या समस्यांकडे सरकार दूर्लक्ष करतय. या अवैध उत्खननाला बड्या राजकीय नेत्यांचा वरदहस्त आहे असा आरोप शिवसेनेनं केला. "वरवर हा प्रश्न साधा वाटला तरी याला सिंधुदुर्गाच्या नेत्यांचा आशिर्वाद आहे" असा आरोप शिवसेना आमदार गजानन कीर्तीकर यांनी केला.सेनेचे आमदार हल्ला चढवत नाही, तोच राणे समर्थकांनी सत्ताधारी बाकावरून प्रतिहल्ला चढवला. "काहीही माहिती न घेता लोक आरोप करत आहे. या प्रकल्पांना स्थानिक जनतेचा नाही, तर सत्तेसाठी राजकारण करणार्‍या राजकारण्यांचा विरोध आहे" असं उत्तर राणेसमर्थक आमदार शंकर कांबळी यांनी दिलं.या प्रकारात मुळ प्रश्न बाजूलाच राहिला आणि हा गोंधळ निस्तरण्यासाठी अध्यक्षांनीच तोडगा सुचवला. "प्रश्नोत्तराच्या तासाचा वेळ वाया घलवण्याऐवजी या विषयाशी संबंधित लोकांची मीटिंग घेऊन हा प्रश्न सोडवावा" असा उपाय अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी सुचवला.प्रश्नोत्तराच्या तासाचा बराचसा वेळ या गोंधळात खर्ची झाला. त्यामुळे उत्खननाचा मुळ प्रश्नही बाजूला पडला.

close