कसाबची झाली ओळखपरेड

December 27, 2008 8:27 AM0 commentsViews: 5

27 डिसेंबर, मुंबईमुंबईतल्या 26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवादी मोहम्मद कसाबला अटक झाली होती. आज त्याची ओळख परेड सुरू आहे. त्याच्याविरोधात दहा गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांच्या प्रक्रियेनुसार त्याची ओळख परेड होणं आवश्यक आहे. त्यासाठी त्याला मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये नेण्यात आलं आहे.कोणताही गुन्हा सिद्ध करण्यासाठी ओळख परेड हा आवश्यक भाग आहे. त्याच्यावर गाडी पळवणे, पोलिसांवर गोळीबार करणे, देशविघातक कट रचणे असे 10 ते 12 आरोप आहेत. त्याला गुन्हा करताना पाहिलेल्या व्यक्तींकडून त्याची ओळख पटवली जाईल.मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातील जिवंत पकडला गेलेला कसाब हा एकमेव आरोपी आहे. त्याच्याकडून या कटासंबंधी बरीच महत्त्वाची माहिती मिळत आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर या हल्ल्यातील पाकिस्तानच्या सहभागाचे बरेच महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याच आधारावर पाकिस्तानविरुद्ध भारताला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळत आहे.

close