..आणि गावितांचाही तोल सुटला,विद्यार्थ्यांना केली शिवीगाळ

April 16, 2013 9:37 AM0 commentsViews: 237

16 एप्रिल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता आणखी एका कॅबिनेट मंत्र्यांचा तोल ढासळलाय. वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी अतिशय अर्वाच्य भाषेत डेंटल काऊन्सिलचे अधिकारी आणि विद्यार्थ्यांना शिवीगाळ केलीय. आयबीएन लोकमतच्या हाती हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ लागलाय. आपले प्रश्न घेऊन हे विद्यार्थी विजयकुमार गावित यांच्याकडे गेले होते. त्यावेळी गावितांनी त्यांना दमदाटी केली, त्यांच्यावर दादागिरी केली. इतकंचं नाही तर, डेंटल कौन्सिलच्या अधिकार्‍यांची निर्भत्सना त्यांनी मूर्ख म्हणून केली. DCI च्या आदेशाला फालतू म्हणून हिणवलं. घडलेली हकीकत अशी की, अकोला इथल्या बाभूळगावच्या जमनलाल गोएंका डेंटल कॉलेजचे विद्यार्थी विजयकुमार गावित यांना गेल्या आठवड्यात भेटायला गेले होते. विजयकुमार गावितांनी विद्यार्थ्यांशी आक्षेपार्ह भाषेत बोलून विद्यार्थ्यांना केबिनमधून अक्षरश: हाकलून लावलं. पण आपल्या शैक्षणिक आयुष्यावर याचा परिणाम होईल, या भीतीनं हे विद्यार्थी पोलिसांत तक्रार करत नाही. जिल्ह्यामध्ये आशुतोष गोएंका यांचं डेंटल कॉलेज आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री जमनलाल गोएंका यांनी स्थापन केलेलं हे कॉलेज आहे. मात्र, त्या कॉलेजमध्ये योग्य सुविधा नाहीत. त्यामुळे या कॉलेजची मान्यता डेंटल काऊन्सिल आणि केंद्र सरकारनं रद्द केली. त्यामुळे या कॉलेजच्या 40 विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय. या विद्यार्थ्यांची BDS ची पहिल्या वर्षाची परीक्षाही झाली नाही. याविरोधात डिसेंबर 2012 मध्ये मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार, या विद्यार्थ्यांना इतर कॉलेजेसमध्ये समावून घेण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले आहे. तर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाला या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याने हे त्रस्त विद्यार्थी मंत्र्यांना भेटायला गेले होते. पण, तिथंही त्यांना दमदाटीची भाषा करण्यात आली. गावितांचाही तोल सुटला

विद्यार्थी – अडचण कुठे आहे?विजयकुमार गावित – अडचण कुठे आहे, सांगतो एकतर आमचा अधिकार नाही. पुन्हा पुन्हा तुम्ही माझ्याकडे यायचं नाही. सुदैव एवढंच आहे, मानसिंग पवार डेंटल कौन्सिलचे सदस्य आहेत. त्यांनी पर्सनल लक्ष घालून ते प्रयत्न करतायात.विद्यार्थी – DCI च्या या ऑर्डरमध्ये लिहिलंय सर की, क्षमता वाढली तरी चालेल मुलांना समावून घ्याविजयकुमार गावित – त्यांना म्हणावं तुम्ही परवानगी द्या. असं फालतू पत्र त्या मूर्खांनी आम्हाला लिहायला नको होतंविद्यार्थी – आमची परीक्षा घ्या ना सर…विजयकुमार गावित – कंटेम्प्ट झालं म्हणून कोर्टात जा. मानसिंग पवार स्वत: करतोय ना प्रयत्न…विद्यार्थी – DCI म्हणतं राज्य सरकारला अधिकार आहेतविजयकुमार गावित – त्यांना म्हणावं, झक मारायला प्रवेश देता का? ट्रान्सफर करायचे अधिकार आम्हाला आहेत ना, त्यांना म्हणावं….XXXX ट्रान्सफर करायचे अधिकार त्यांचे आहेत ना. त्यांना म्हणावं, तुम्ही आम्हाला ऍडमिशन देता. त्यांची परवानगी नाही, तुम्हाला कसं ट्रान्सफर करणार?

आता विद्यार्थ्यांशी ते कसे वागले ते पाहा…विजयकुमार गावित -बाहेर जा म्हटलं ना…नाहीतर होत असेल ते पण मी करणार नाही XXXXस्वत:ला काय शहाणे समजता का तुम्ही?तो माणूस सकाळपासून येऊन बसलाय मी सांगतोय तुम्हाला आम्ही प्रयत्न करतोय…इथं मी आहे, म्हणून हे होऊ लागलंय, नाहीतर ते पण होणार नाही…आम्ही काय झक मारतोय…विद्यार्थी – सर, शिव्या देऊ नकाविजयकुमार गावित – चल बाहेर जा XXX मला शिकवताय…! आगाऊपणा करू नका.विद्यार्थी – आगाऊपणा काय यात? सिंपथीने भेटायला आलो…विजयकुमार गावित – काय सिंपथी? बिलकुल करणार नाही. जा कुठं जायचं ते.

close