अनामी रॉय यांच्या हाकालपट्टीची मागणी

December 27, 2008 8:33 AM0 commentsViews: 7

27 डिसेंबर, नागपूरराज्याचे पोलीस महासंचालक ए एन रॉय यांची हकालपट्टी करावी यासाठी विधानसभेत विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे सभाग़हाचं कामकाज तहकूब करावं लागलं. मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते राज अवस्थी यांना एमपीडीए कायद्याखाली अटक करण्याचे आदेश तेव्हा मुंबईचे पोलीस कमिशनर असलेल्या ए एन रॉय यांनी दिले. त्यासाठी खोटी कागदपत्रं बनवली असा आरोप आहे. नॅशनल अलायन्स फॉर पीपल्स मूव्हमेंटचे पदाधिकारी राज अवस्थी यांच्यावर कारवाई केल्याप्रकरणी रॉय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अ‍ॅडिशनल सी. पी. आर. एन. तडवी, पीआय विलास पवार या अधिकार्‍यांचाही यात समावेश आहे. त्याबाबत रॉय यांच्यावर गुन्हा दाखल करावा असा आदेश मुंबईच्या वांद्रे कोर्टानं दिला आहे. याचे पडसाद विधानसभेत उमटले. विरोधी पक्षांनी स्थन प्रस्तावानुसार काम बाजूला ठेवून या प्रकरणाची चर्चा करण्याची मागणी केली. रॉय यांना पदावरुन ताबडतोब हटवण्याची मागणी केली. स्थगन प्रस्तावाची मागणी अध्यक्षांनी फेटाळली. त्यामुळं विरोधकांनी रॉय हटावच्या घोषणा देत अध्यक्षांसमोर धाव घेतली. या गोंधळात सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

close