चेन्नईचा ‘सुपर’ विजय

April 10, 2013 5:39 PM0 commentsViews: 14

09 एप्रिल

आयपीएलच्या दोनवेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जनं यंदाच्या हंगामातला पहिला दणदणीत विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्जनं किंग्ज इलेव्हन पंजाबचा 10 विकेट राखून धुव्वा उडवलाय. पहिली बॅटिंग करणारी पंजाबची टीम 138 रन्सवर ऑलआऊट झाली. डेव्हिड हसी आणि गुरकिराट सिंग वगळता पंजाबची बॅटिंग फ्लॉप ठरली. याला उत्तर देताना मायकेल हसी आणि मुरली विजय या ओपनिंग जोडीनं फटकेबाजी करत चेन्नईला शानदार विजय मिळवून दिला. दोघांनी शानदार हाफसेंच्युरी ठोकली.

close