जयंत पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ

December 27, 2008 6:46 AM0 commentsViews: 77

27 डिसेंबर, मुंबईजयंत पाटील यांनी गृहमंत्री म्हणून कारभार स्वीकारल्यावर त्यांची सुरक्षा वाढवली जातेय. याचाच एक भाग म्हणून त्यांच्या 'रॉयल स्टोन' या सरकारी बंगल्याच्या भिंतीची उंची वाढवण्यात येत आहे. मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन विभागाचा हा निर्णय असल्याचं सांगण्यात येत असलं तरीही त्याबद्दल थेट माहिती मिळू शकत नाही. जयंत पाटील यांच्या बंगल्याच्या भिंतीचं बांधकाम जुन्या दगडात बांधली गेली आहे. मात्र आता ती अधिक मजबूत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्हीआयपींना संरक्षण पुरवणार्‍या खात्याने पीडब्ल्यूटी खात्याला या बांधकामेचे आदेश दिले आहेत.

close