‘ठाणे बंदला पाठिंबा नाही, बंद हाणून पाडा’

April 17, 2013 1:55 PM0 commentsViews: 10

17 एप्रिल

अनधिकृत बांधकामं करणार्‍यांना कोणीही काही बोलत नाही. फक्त आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. म्हणून उद्याच्या ठाणे बंदला माझा पाठिंबा नाही. ठाणेकरांनी हा बंद हाणून पाडावा असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. तसंच अनधिकृत बांधकामांना अभय देणार्‍यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. त्याचसोबत माझ्या पक्षातल्या कोणत्याही नगरसेवकाचं अनधिकृत बांधकामाशी काहीही संबंध असेल, तर त्यांच्यावरही कारवाई करा. एवढेच नाही तर माझ्या पक्षातील लोकप्रतिनिधी जर अशा प्रकारच्या कामांमध्ये सहभागी असल्यास आढळून आले तर आपण त्यांची पक्षातून हकालपट्टी करु असा इशाराही राज यांनी दिलाय. बेकायदा बांधकामांना अधिकृत करण्याची गरज नाही मात्र वर्षांुवर्ष तिथं राहणार्‍या भूमिपूत्रांची दुसर्‍या ठिकाणी राहण्याची सोय करून द्यावी अशी मागणीही राज यांनी केली.

close