भारतीयांनी पाकिस्तानात जाऊ नये: परराष्ट्रमंत्रालय

December 27, 2008 8:53 AM0 commentsViews: 1

27 डिसेंबरभारतीय नागरिकांनी पाकिस्तानात जाऊ नये, तसंच पाकमध्ये राहणार्‍या भारतीयांनीही सावध राहावे असा सल्ला परराष्ट्रमंत्रालयानं दिला आहे. पाकिस्तानमधल्या मुलतान आणि पेशावरमध्ये काही भारतीय नागरिकांना पकडल्याची बातमी पाकिस्तानी मीडियानं दिली आहे. या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयानं हा सल्ला दिलाय. दरम्यान धरपकड केलेले भारतीय नागरिक पाकिस्तानी पोलिसांच्या नाही तर काही अज्ञात एजन्सीजच्या ताब्यात असल्याची शंका बातमीत व्यक्त केली गेली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानचा सहभाग उघड झाला आहे. त्यामुळे आपल्या बूमीतील दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी त्यांच्यावरील दबाव सतत वाढत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतावरच त्यांनी दहशतवादाचे उलटे आरोप केले. लाहेर स्फोटप्रकरणी एका भारतीयाला पकडल्याचा दावाही त्यांनी केला, मात्र पाकिस्तानातीलच एका दहशतवादी संघटनेने स्फोटाची जबाबदारी स्वीकारल्यावर पाकिस्तान तोंडघशी पडलं. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

close