बेनझीर भुत्तो यांचा प्रथम स्मृतिदिन

December 27, 2008 9:06 AM0 commentsViews: 2

27 डिसेंबरपाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचा आज प्रथम स्मृतिदिन. त्यांच्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण झालं. बेनझीर यांच्या स्मरणार्थ पाकिस्तानात आज विविध कार्यक्रम राबवण्यात आलेयत. कालपासूनच भुत्तो यांच्या चाहत्यांनी आणि समर्थकांनी त्यांच्या कबरीजवळ गर्दी करण्यास सुरुवात केली होती. गढी खुदा बख्श येथील त्यांच्या जुन्या घराजवळही समर्थकांची गर्दी जमली होती. गेल्या वर्षी रावळपिंडी येथे निवडणूक प्रचारादरम्यान भूत्तो यांची हत्या झाली. या हत्येची चौकशी एक स्वतंत्र समिती नेमून करण्यात येईल अशी आशा संयुक्त राष्ट्रांना अजूनही वाटत आहे.

close