अजित पवार,गडकरी,मुंडेंनी घेतली लाच -मेधा पाटकर

April 18, 2013 4:10 PM0 commentsViews: 40

18 एप्रिल

विदर्भातील गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील घोडचेरी सिंचन प्रकल्पात कंत्राटदाराने उपमुख्यमंत्री अजित पवार, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे या राजकीय नेत्यांसह अनेक सरकारी अधिकार्‍यांना लाच दिली असा खळबळजनक आरोप जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला आहे. यात व्यवहारात अजित पवारांना साडेसत्तावीस कोटी, नितीन गडकरींना 50 लाख, गोपीनाथ मुंडेंना 20 लाख अशी लाच देण्यात आल्या आहे. गोसीखुर्द कालव्यातील एका भागाचं कॉन्ट्रॅक्ट महालक्ष्मी इन्फ्रास्टक्चर कंपनी लिमिटेडमधल्या एका संचालकाच्या कार्यालयावर इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकार्‍यांनी धाड टाकली होती. या धाडीत पैसेवाटपाबाबतचे काही कागदपत्र इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकार्‍यांच्या हाती लागले होते. हे कागदपत्र मेधा पाटकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळवले असून या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी हे आरोप केले आहेत.

close