‘अजित पवार राजीनामा देणार नाही’

April 12, 2013 9:54 AM0 commentsViews: 51

12 एप्रिल

अजित पवारांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. त्यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल विधानसभेच्या दोन्ही सभागृहात माफी मागितली आहे. तसंच आपल्या कारकिर्दीतली ही सगळ्यात मोठी चुक होती त्याबद्दल जनतेनी माफ करावं अशी विनंतीही त्यांनी केली होती. त्यामुळे त्यांनी माफी मागितल्यामुळे राजीनाम्याचा प्रश्न संपला आहे असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिलं आहे. पण इतकी चर्चा होऊनही याप्रकरणावर पक्षाध्यक्ष शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आज यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शरद पवारांची भेट घेणार आहेत अशीही माहिती कळतेय.

इंदापूरमध्ये झालेल्या सभेत अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांनी अर्वाच्य भाषेत थट्टा उडवली होती. त्यांच्या बेताल वक्तव्यावरुन राज्यभरात सगळ्याच स्तरांमधून टीका झाली. अजित पवारांनी माफीही मागितली. पण विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. मनसे आणि शिवसेनेनं राज्यभरात निदर्शनं करून राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. आता शरद पवार या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे त्यानंतर शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

close