दाऊदच्या भाचीचा विवाह

December 27, 2008 9:12 AM0 commentsViews: 4

27 डिसेंबर, मुंबईकुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या भाचीच्या लग्नाचं आमंत्रण मुंबई पोलीसांच्या बड्या अधिकार्‍यांना गेलं आहे. दाऊद ची बहीण फरझाना मुंबईत डोंगरी इथं राहते. तिची मुलगी साहिला हिचं लग्न वांद्रे इथल्या एका बिझनेसमनशी होणार आहे. आज डोंगरी इथल्या नूरबाग इथं हे लग्न होतंय. मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस या लग्नावर लक्ष ठेवून आहेत. या लग्नाचं आमंत्रण बडे पोलीस अधिकारी, राजकीय नेते, उद्योगपती यांना देण्यात आलं आहे.

close