ठाणे बंदला हिंसक वळण, ठाणेकरांचे हाल

April 18, 2013 4:24 PM0 commentsViews: 36

18 एप्रिल

ठाणे : अनधिकृत बांधकांमाच्या कारवाईविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि शिवसेनेनं ठाणे बंद पुकारलाय. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे. दरम्यान या बंदला हिंसक वळण लागलंय. मनसेनं परिवहन व्यवस्थापकाच्या कार्यालयात तोडफोड केली. बंदमुळे आज ठाण्यात रिक्षा बंद आहेत तसंच टीएमटीच्या बसेसही तुरळक धावतायेत. टीएमटीच्या बसेस जास्त सोडाव्यात या मागणीसाठी मनसेनं परिवहन व्यवस्थापकाच्या कार्यालयात तोडफोड केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं पुकारलेल्या आजच्या बंदमध्ये मनसे सहभागी नाही. सर्वसामान्यांना वेठीस धरू नका, असं म्हणत मनसेनं ही तोडफोड केली.

मुंब्रामधली अनधिकृत इमारत पडून 74 जणांचे जीव गेले आणि त्यानंतर ठाण्यात अनधिकृत बांधकामांवर जोरदार कारवाई सुरू झाली. या कारवाईला विरोध करत ठाणे बंद पुकारण्यात आला होता. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सत्ताधारी शिवसेनेने एकत्र येऊन बंद पुकारल्यामुळे स्वाभाविकपणे दुकानं आणि रिक्षा बंद होत्या. त्यामुळे सर्वसामान्य ठाणेकरांचे अतोनात हाल झाले. बंद यशस्वी व्हावा.. म्हणून आदल्या रात्रीच टीएमटीच्या 3 बस तसंच 5 रिक्षांची तोडफोड करण्यात आली. तसंच 10 बसेसची हवा काढण्यात आली. त्यामुळे सिटी बसेस तुरळक धावत होत्या. तर दुसरीकडे.. टीएमटीच्या बसेस जास्त सोडाव्यात या मागणीसाठी मनसेनं परिवहन व्यवस्थापकाच्या कार्यालयात तोडफोड केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं पुकारलेल्या बंदला मनसेने विरोध केला.ठाणे जिल्ह्यातल्या अनेक शहरांना अनधिकृत बांधकामांच विळखा आहे आणि या इमारतींमध्ये हजारो मतदार राहतात आणि त्यांच्या मतांवर डोळा ठेवणार्‍या राजकीय पक्षांनी कायद्याप्रमाणे जगणार्‍या ठाणेकरांना मात्र वेठीला धरलं.

close